Shivsena Prabhadevi Rada Special Report : विसर्जन मिरवणुकीत ठाकरे गट - शिंदे गट आमने सामने
abp majha web team | 11 Sep 2022 11:33 PM (IST)
शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ झालीय. प्रभादेवी इथं कार्यकर्त्यांच्या राड्यादरम्यान शस्त्राचा दुरुपयोग केल्याप्रकऱणी सरवणकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस सदा सरवणकरांची बंदूक जप्त करणार आहेत. शिवसैनिकांना अटकेनंतर शिवसेना नेत्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडलं होत. यावेळी राड्यात सरवणकरांनी गोळीबार केलाच्या आरोप शिवसेना नेत्यांनी केला होता. दरम्यान पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतरच शिवसेना नेत्यांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.