Dharavi Protest : अदानीची सुपारी अडकित्त्याने ठेचू ; विरोधाला धार, ठाकरेंचा एल्गार Special Report
abp majha web team | 16 Dec 2023 11:51 PM (IST)
धारावी... तब्बल ५३५ एकरच्या परिसरात दाटीवाटीनं पसरलेली वस्ती आणि लोकसंख्या सुमारे १० लाख... अरूंद गल्ल्या, झोपड्यांचं साम्राज्य आणि अनेक छोटे-मोठे उद्योग... याच धारावीचा आता विकास होणार आहे आणि ते काम देण्यात आलंय, अदानी समूहाला. मात्र, या प्रकल्पाला ठाकरे गटाने कडाडून विरोध केलाय. अदानींकडून हे काम काढून घ्यावं अशी मागणी करून ठाकरे गट आक्रमक झालाय. आणि त्यासाठीच धारावीत मोर्चाही काढण्यात आला... याच धारावीच्या भूमीतून ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर तोफ डागलीये. पाहूया धारावीच्या पुनर्विकासावरून कसं राजकारण पेटलंय?