Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
आजवर मराठी मतांवर दावेदारी करणारे दोन पक्ष, म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि धाकट्या ठाकरेंची मनसे यावेळी पहिल्यांदाच एकत्र आलेत... आजवर मुंबईच्या मराठीबहुल मतदारसंघांमध्ये या दोघांमध्ये टक्कर असायची... पण यावेळी मात्र दोघांची युती असल्यामुळे वेगळाच पेच आहे... कोणती जागा कुणी लढवायची, कुणाला तिकीट द्यायचं.. बंडखोरी कशी टाळायची... या प्रश्नांची उत्तरं शोधत ठाकरे आपले हे बालेकिल्ले राखणार का?, याची आता मुंबईकरांना उत्सुकता आहे... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...
दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे ब्रँडची ग्रँड परीक्षा
मराठी मतदारांचा कौल कुणाला?
राजकीय बालेकिल्ले राखण्याचं कडवं आव्हान
२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत..
आणि या बंधूयुतीमागचं सर्वात मोठं उद्दीष्ट म्हणजे मुंबई महापालिका...
ज्या मराठी मतांच्या जोरावर ठाकरे बंधूं मुंबईत महापौर बसवण्याचं स्वप्न पाहताहेत,
ती मराठी मतं सर्वाधिक एकवटली आहेत ती दक्षिण मध्य मुंबईत...
वरळी, शिवडी, दादर, माहिम अशा मराठी मतदारसंघांसाठी ठाकरेंची ही युती अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
मात्र यापैकी काही जागांची उमेदवारी अजूनही घोषित न झाल्यानं सस्पेन्स वाढतोय...
दादरमधल्या 192 या प्रभाग क्रमांकाची जागा मनसेला सुटलीय.
याप्रभागातून मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फ़ॉर्म देऊन त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय...
तर आणखी एक जागा म्हणजे प्रभाग क्रमांक 194 मधून सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार असतील.
खरंतर या मतदारसंघातून मनसेच्या पहिल्या फळीतले नेते संतोष धुरी हे इच्छुक होते, त्यामुळे त्यांची नाराजी कशी दूर होणार हे पाहाणंही महत्वाचं.
दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 102 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आल्याचीही माहिती मिळतेय.
त्याचवेळी मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी मात्र एबी फॉर्मसाठी मातोश्रीवर चकरा मारल्यात...