Tehrik-e-Taliban Kashmir : काश्मीरात हल्ल्यासाठी नव्या दहशतवादी संघटनेला ट्रेनिंग Special Report

Tehrik-e-Taliban Kashmir : काश्मीरात हल्ल्यासाठी नव्या दहशतवादी संघटनेला ट्रेनिंग Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर रावणाचं एक मुंडकं कापलं की दुसरं जन्माला येतं, दुसरं कापलं की तिसरं जन्माला येतं, तसंच काहीसं पाकिस्तानचंही झालं आहे. आजपासून बरोबर महिनाभरापूर्वी ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय लष्करानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांना अस्मान दाखवलं. पण तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. आता पाकिस्ताननं नव्या दहशतवादी संघटनेला जन्म दिलाय. पाहूया, त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. पाकिस्तानकडून नव्या दहशतवादी संघटनेला जन्म. ‘तहरीक-ए-तालिबान काश्मीर’ नावानं नवी दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये हल्ला करण्यासाठी, नव्या दहशतवादी संघटनेला ट्रेनिंग. पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबत नाहीत. ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्ताननं आता आपली दहशत वाढवण्यासाठी, नव्या दहशतवादी संघटना जन्माला घालण्यास सुरुवात केली आहे. ‘तहरीक-ए-तालिबान’नं स्वतःचं नाव पुढे यायला नको, म्हणून या दहशतवादी संघटनेची जबाबदारी इतरांवर दिली आहे. ‘तहरीक-ए-तालिबान काश्मीर’चा प्रमुख आहे मौलाना मकबूल दार, तर प्रवक्ता आहे मुफ्ती महबूब बट, सोपोर. पण पुढे आलेली ही नावं बोगस असल्याचा अंदाज, चुकीचा ठरणार नाही. खरं तर, आयएसआयने ही दहशतवादी संघटना चालवण्याची जबाबदारी माजी पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि वॉन्टेड दहशतवादी अब्दुल्ला उमर खानला दिल्याची माहिती आहे. यापुढे काश्मीरमध्ये होणाऱ्या हल्ल्यात, कुठेही पाकिस्तानी लष्कर, जैश किंवा ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चं नाव समोर येऊ नये, याची पुरेपूर काळजी असीम मुनीरनं घेतल्याचं दिसतंय. नव्या दहशतवादी संघटनेचं हेच खोटं लपवण्यासाठी, मुनीरनं आणखीन एक खोटं पेरायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी पोलीस अब्दुल्ला उमर खान, उर्फ गाझी शहजादचा शोध घेत आहेत, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझी शहजाद हा सध्या पीओके आणि खैबर पख्तूनख्वाच्या सीमेवरील आयएसआयच्या एका सेफ हाऊसमध्ये आहे आणि तिथे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय त्याला सुरक्षा पुरवतात. एकूणच काय, तर असीम मुनीरनं भारताविरुद्ध नवी खेळी खेळायला सुरुवात केली आहे. पण डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीला जग बघत असतं, हे कुठे ठाऊक आहे? मुनीरच्या या कुरापतींचा पर्दाफाश झालाय, पण मुनीरच्या या सगळ्या लपवाछपवीत एक गोष्ट नक्की आहे, ऑपरेशन सिंदूरची धास्ती पाकला एवढी आहे की, आता समोरून थेट वार करायची हिंमत त्यांच्यात दिसत नाही. म्हणूनच, बनावटीचा डाव मांडला जातोय, पण हा डाव कसा मोडायचा, हे भारतीय सेनेला चांगलंच माहीत आहे.