Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tanaji Sawant on Mahayuti : आरोग्यमंत्र्यांच्या उलट्या , महायुतीला मळमळ Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या महायुतीत मिठाचा खडा पडण्याची वेळ आलीय...कारण ठरलेत शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत...सावंतानी थेट राष्ट्रवादीबद्दलची मळमळ बोलून दाखवली...आणि भडका उडाला...आता महायुतीतला हा वाद कोणत्या औषधानं मिटणार हा प्रश्न आहे. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...
महायुती सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत कधी काय बोलतील याचा नेम नाही
याआधी अनेकदा नको त्या वक्तलव्यानं आपल्याच पक्षाची कोंडी केेलेल्या
सावंतांनी यावेळी आपल्या मनातली मळमळ बोलून दाखवली...
आणि त्यामुळे वक्तव्य़ामुळे महायुतीचंच आरोग्य बिघडण्याची वेळ आली...
थेट राष्ट्रवादीला उद्देशून केलेल्या तानाजी सावंतांच्या या वक्तव्याचा व्हायचा तोच परिणाम झाला...राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरपारची भाषा करत थेट महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला...
सावंतांचं हे विधान
नव्या घडामोडींचे संकेत आहेत का?
अशाही चर्चा रंगू लागल्यात
तानाजी सावंतांच्या विधानांमुळे यापूर्वी अनेकदा एकनाथ शिंदे अडचणीत आलेत
विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरलेले असताना
सावंतांनी हे विधान केल्यानं
आता महायुतीची घडी विस्कटते?
की मग मळमळीवर औषध शोधून
टीकेच्या उलट्या थांबवण्यात
महायुती यशस्वी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल