Taliye : तळीये गावातील दरड दुर्घटना, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, कणखर सह्याद्री का ढासळला?
डॉ. कविता राणे Updated at: 25 Jul 2021 11:36 PM (IST)
गेल्या आठवडाभर सुरु असलेला पावसाने हजारो घरं उद्ध्वस्त केली. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहे. या दरडी अनेक निष्पाप जीव गेले आहेत. NDRF ने जारी केलेल्या आकडेवारी नुसार रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यात एकूण पाच दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्यात. या घटनांमध्ये एकूण 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.