पुण्यात श्वानाचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया,दीपिकावर लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रॅक्ट्रॉमी
मिकी घई, एबीपी माझा, पुणे | 19 Jun 2021 11:29 AM (IST)

पुणे तिथे काय उणे या म्हणीला खरी ठरवणाऱ्या अनेक घटना आपण यापूर्वी पाहिल्या ऐकल्या असती. हीच म्हण सार्थ ठरवणारी आणखी एक घटना पुण्यात घडली आहे. एका श्वानाचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी चक्क शस्त्रक्रिया करण्यात आली. ही भारतातील बहुधा पहिलीच शस्त्रक्रिया असावी.