Dhas Munde Meet : धनंजय मुंडे, सुरेश धस... दोनदा भेटले, प्रकरण मिटले? Rajkiya Sholey Special Report
abp majha web team | 14 Feb 2025 11:20 PM (IST)
Dhas Munde Meet : धनंजय मुंडे, सुरेश धस... दोनदा भेटले, प्रकरण मिटले? Rajkiya Sholey Special Report
धनंजय मुंडेंवर नवीन आरोप करायचा हा भाजप आमदार सुरेश धस यांचा दिनक्रम झाला होता... आणि सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर बोट ठेवत दमानिया, जरांगे, क्षीरसागर, सोनवणे, सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर आगपाखड करायची हे देखील नित्याचच झालं होतं.. मात्र आता ही सर्व मंडळी सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करताहेत.. कारण सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्याच झालेली बैठक... ती देखील एकदा नव्हे तर दोनदा... एबीपी माझानं या गुप्त भेटीचा उलगडा केला आणि एकच खळबळ उडाली. सुरेश धस यांना कबुली देण्यावाचून पर्याय उरला नाही..पाहुयात सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या बैठकांची ही इनसाईड स्टोरी