Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report

राजकारणात नेत्यांना दादा, भाऊ, ताई, साहेब अशा नावांनी ओळखलं जातं. अगदी गल्लीतल्या छोट्या नेत्यापासून ते राज्यपातळीवरच्या मोठ्या नेत्यापर्यंत अनेकांची ओळख अशाच नावांशी जोडलेली असते. यात आता आणखी एका नावाचा प्रवेश होतोय. हे नाव आहे वहिनी. महाराष्ट्रात वहिनी या नावाचं आता ब्रँडिंग सुरु झालंय का, असा प्रश्न आज अनेकांना पडला. आणि त्याचं कारण ठरलं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेलं एक वक्तव्य. पाहूया, हा रिपोर्ट.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलतायत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविषयी.
राजकारणात नेत्यांच्या नावाला जितकं महत्त्व असतं, तितकंच महत्त्व त्यांच्या टोपणनावांनाही असतं.
अजित पवार हे महाराष्ट्रात दादा नावानं ओळखले जात होते.
तर सुनेत्रा पवारांचा उल्लेख राजकीय वर्तुळात वहिनी असाच व्हायचा.
मात्र अजितदादांच्या निधनानंतर पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर त्यांनी घेतली आणि राज्यासोबत देशभरात सुनेत्रा पवार चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या.
अगोदर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, त्यानंतर पक्षाध्यक्षपदी निवड आणि मग पोटनिवडणुकीत विजय मिळवून सुनेत्रा पवारांनी पुढच्या राजकीय प्रवासाची औपचारिकता पूर्ण केलीय.
त्यामुळं यापुढं सुनेत्रा पवारांची देशपातळीवर कशी ओळख असेल, हे सांगताना प्रदेशाध्यक्ष तटकरेंना इतर महिला नेत्यांची उदाहरणं देण्याचा मोह आवरला नाही.