दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर होताच विदर्भातील पालकांना भर हिवाळ्यात फुटला घाम
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2021 12:15 AM (IST)
चंद्रपूर : कोरोनामुळे या वर्षी शैक्षणिक वर्षाला बरीच उशिरा सुरुवात झाली आणि त्याच मुळे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचा शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केलाय. मात्र मे महिन्यात 47 अंश तापमान असणाऱ्या विदर्भात परीक्षा घेण्यास अनेक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. मुलांच्या जीवनात अतिशय महत्वाचा शैक्षणिक टप्पा म्हणजे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा... कोरोनामुळे या वर्षी मुलांचं निम्मं शैक्षणीक वर्ष वाया गेलं आणि आत्ता कुठे अभ्यासाची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली आहे. त्यातच काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आणि तिकडे विदर्भातील पालकांना भर हिवाळ्यात घाम फुटला.