Sri Lanka Crisis : आर्थिक अडचणीत श्रीलंका, देशात अशांतता, बुडत्या श्रीलंकेला भारताचा आधार!
अभिजीत करंडे, एबीपी माझा | 09 Apr 2022 11:12 PM (IST)
Sri Lanka Crisis : भारताचा शेजारी देश श्रीलंका आज गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रियाही रुग्णालयात होत नाहीत, कारखाने बंद, पेपर कमी असल्याने परीक्षा रद्द, रेल्वे-बसची वाहतूक ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेलाचा अभाव.. पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे, घरातील चुल बंद झाल्या आहेत आणि खाण्यापिण्याच्या तुटवड्यामुळे दुकानांमध्ये लूट सुरू झाली आहे.