Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील आग कधी शांत होणार? आंदोलन, जाळपोळ आणि नागरिकांचा असंतोष
abp majha web team | 11 May 2022 10:58 PM (IST)

श्रीलंकेमध्ये परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. तिथे सुरु असलेला हिंसाचार पाहता संरक्षण मंत्रालयाने लष्कराला गोळीबाराचा आदेश दिलाय. जे नागरिक सरकारी मालमत्तेचं नुकसान करत असतील किंवा हिंसाचारामध्ये सहभाग घेत असतील त्यांना थेट गोळ्या घाला, असा आदेश श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला दिलाय.