Special Report : महाराष्ट्राला या पाच वर्षातला चौथा मुख्यमंत्री मिळणार का ? : ABP Majha
abp majha web team | 30 Apr 2023 11:22 PM (IST)

गावच्या पारावर, नाक्यावर, चहाच्या टपरीवर अहो एवढंच काय तर कॉलेजच्या कट्ट्यावरही एकच चर्चा रंगतेय. ती म्हणजे महाराष्ट्राला या पाच वर्षातला चौथा मुख्यमंत्री मिळणार का? या चर्चांमागचं कारण गेल्या काही दिवसातलं राज्यातलं राजकारण आहे..मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं अजित दादा म्हणाले आणि थेट भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे बँनर झळकले. यावरुन अनेक प्रतिक्रियाही आल्या..या चर्चा थांबत नाही तोवर शरद पवारांनी एक विधान केलं...भाकरी बदलण्याची वेळ आली आहे असं शरद पवार म्हणाले आणि पुन्हा सत्तांतराच्या चर्चांना उत आला... एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुरु झालेल्या चर्चा महिना संपला तरी सुरुच आहेत.पाहूया त्यावरचाच हा एक रिपोर्ट....