Special Report : मुंबईला 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, आधीच उकाडा त्यात पाणीकपातीचं टेन्शन
abp majha web team
Updated at:
05 Jun 2023 10:37 PM (IST)
डोक्यावर सुर्य आग ओकत असताना मुंबईकरांच्या घशाला कोरड पडते की काय अशी शक्यता निर्माण झालीये. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. . त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट असतानाच राज्य सरकारने भातसा धरणाच्या मदतीने पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तर दुसरीकडे मुंबईतल्या पाणीपट्टीत होणाऱ्या वाढीला भाजपने विरोध केलाय. त्यामुळे आता पाण्यावरुन राजकारण पेटणार असल्याची चिन्ह दिसतायत.