Special Report : उद्ध्वस्त बालासोरला सावरणारे मराठी हात! रेल्वे दुर्घटनेनंतर कोणतं आव्हान होतं?
abp majha web team | 05 Jun 2023 10:02 PM (IST)
ओडिशामध्ये रेल्वे दुर्घटनेला आज तीन दिवस पूर्ण झालेत. दुर्घटनेत मृतांचा आकडा २७५ वर गेलाय. तर जखमींचा आकडा बाराशेवर पोहोचलाय. दुसरीकडे जिथं दुर्घटना झाली होती. तिथून रेल्वे सेवा पुन्हा सुरु देखील झालीय. त्यासाठी १ हजार कामगारांनी नॉनस्टॉप ५१ तास काम केलंय. पण, याच बालासोर दुर्घटनेनंतर जखमींसह उद्ध्वस्त कुटुंबाना आधार दिला तो एका मराठी माणसानं.. त्यांचं नाव आहे दत्तात्रय शिंदे.. सध्या हेच दत्तात्रय शिंदे बालासोरचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्याच नेतृत्वात दुर्घटनेत बचावकार्य पार पडलं.. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं.. पाहुयात..