Special Report Thackeray Group : ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन तयार? ठाकरे कुटुंब महाराष्ट्र दौरा करणार?
abp majha web team | 20 Feb 2023 10:35 PM (IST)
शिवसेना पक्षातील वाद हा थांबता थांबत नाही. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव हे शिंदे गटाला दिल्यानंतर आता ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे. शिंदे गट आता हळूहळू संपूर्ण शिवसेना काबीज करण्याचा प्लॅन आखतोय. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून शिंदेंना टक्कर देण्यासाठी पुढची रणनीती आखली जातेय. पाहूयात ठाकरेंच्या रणनीतीवरचा हा स्पेशल रिपोर्ट..