Special Report : Terrorists Asif Sheikh & Adil Thoker Blown Up : घरं बेचिराख, क्रूरकर्म्यांना ठेचा
Special Report : Terrorists Asif Sheikh & Adil Thoker Blown Up : घरं बेचिराख, क्रूरकर्म्यांना ठेचा
पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना मारणाऱ्या , त्यांचं कुटुंब, त्यांचं घर उद्ध्वस्त करणाऱ्य़ा जिहादी अतिरेक्यांवर पहिला प्रहार केला आहे. या हल्ल्यात सामील असलेल्या काश्मीरमधील दोन अतिरेक्यांचं घर स्फोटात उद्ध्वस्त कऱण्यात आलंय.
तुम्ही हल्ले कराल, धर्म विचारुन निष्पाप नागरिकांची हत्या कराल, त्यांच्या कुटुंबियांना जीवनातून उठवाल तर त्याचे हादरे तुमच्या घराला, तुमच्या कुटुंबालाही सहन करावे लागतील हा संदेश देण्यात आला आहे. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
पहलगाममध्ये निशस्त्र पर्यटकांना धर्म विचारुन मारणाऱ्या जिहादी अतिरेक्यांवर कारवाईला सुरुवात झालीय..
या हल्ल्यात पाकिस्तानच्या अतिरेक्यांसोबत काश्मीरचे दोन अतिरेकी सुद्धा असल्याचं समोर आलं होतं.
या दोन्ही अतिरेक्यांची घरं उद्धवस्त करण्यात आली आहेत.
लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी आदिल ठोकर उर्फ आदिल गुरी हा बिजबेहारा चा रहिवासी आहे. आदिल २०१८ मध्ये वैधरित्या पाकिस्तानला गेला होता, तिथे दहशतवादी प्रशिक्षण घेऊन गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरला परत आला असा आरोप आहे. त्याच्या घरी सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम आणि कारवाई केली. त्या दरम्यान मोठा स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय.