Special Report : सावधान! तापमान वाढतंय...राज्यात उष्णतेची लाट, पारा 40 अंशांच्या पार
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2021 12:05 AM (IST)

राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत दिवसाच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीत जाण्याची चिन्हे आहेत. निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उन्हाच्या झळापासून सावधान रहा, असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.
पुढच्या तीन-चार दिवसांमध्ये हा उन्हाचा कडाका आपल्याला लाही-लाही करू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन ते चार दिवसांच्या कालावधीत 2 ते 3अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे.