Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
जम्मू काश्मीर पोलिसांनी जिहादी डॉक्टरांचं जाळं शोधून काढलं, दिल्ली स्फोट टाळता आला नाही पण इतर राज्यातील तपास यंत्रणांच्या मदतीनं देशभरात स्फोट करण्याचा कट उधळून लावला. मात्र फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचाच नमुने घेताना श्रीनगरच्या नौैगाममध्ये मोठा स्फोट झाला. अपघाताने झालेला हा स्फोट एवढा मोठा होता की ९ जणांचा हकनाक बळी गेला ३० अधिकारी जखमी झाले. पाहुयात.
देशाची राजधानी दिल्लीत झालेला स्फोट आणि त्याचे जम्मू-काश्मीर कनेक्शन यातून सावरत असतानाच एका मोठ्या स्फोटाने काश्मीर खोरे हादरुन गेले श्रीनगरपासून अवघ्या ९-१० किलोमीटर अंतरावर नौगाम पोलिस स्टेशनमध्ये रात्री साडे अकरा वाजता हा स्फोट झाला स्फोटात ९ जण ठार तर ३२ जखमी झाले, जखमींमध्ये २७ पोलिस अधिकारी, २ महसलू अधिकारी आणि ३ नागरिकांचा समावेश आहे. परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. या भागाला स्फोटांचे, गोळीबाराचे आवाज नवे नाहीत. पण शुक्रवारी झालेला स्फोट वेगळा होता. दिल्ली स्फोटाच्या कटातील जिहादी डॉक्टरांच्या टोळींकडून फरिदाबादमधून अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटकं जप्त केली होती. ती ३५८ किलो स्फोटकं नौगाममध्ये ठेवली होती. त्याची तपासणी सुरु होती, फॉरेन्सिक टीम, अधिकारी आणि पोलिस कर्मचारी इथे उपस्थित होते. स्फोटकांचे नमुने घेताच स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय स्फोट इतका शक्तिशाली होता की पोलिस ठाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मृतदेहाचे काही अवशेष ३०० फूटांवर आढळून आले. हा घातपात नसून अपघात असल्याची माहिती यंत्रणांनी दिली