Shivsena VS Rane :सेना विरुद्ध राणे... संघर्षयात्रा! Narayan Rane आणि शिवसेना वादाचा पुन्हा नवा अंक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पेलिसांनी अटक केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते. नारायण राणेंना अटक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात अटकाव केल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे या नंतर आता शिवसेना विरुध्द पंतप्रधान मोदी असा दुसरा अंक सुरु होणार आहे.
या वादाची ठिणगी नेमकी कशी पडली? शिवसेनेच्या आणि नारायण राणेंची संघर्षयात्रा, पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.