Special Report : पुन्हा देशाच्या संसदेत येणार 'सेंगोल', सेंगोल आणि स्वातंत्र्यदिनाचा इतिहास!
abp majha web team | 24 May 2023 11:30 PM (IST)
संसदेच्या नव्या इमारतीचं २८ मे रोजी उद्घाटन होईल. त्यासाठी केंद्रानं तयारीही सुरु केलीय. तर दुसरीकडे १९ पक्षांनी मात्र, उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या इमारतीचं उद्घाटन केलं जाईल.. आणि त्यालाच विरोध करत आहेत १९ पक्ष.. हा विरोध असला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मात्र, स्पष्ट केलंय, की पंतप्रधान नरेंद्र मोदीच इमारतीचं उद्घाटन करणार आहेत.. हे सांगत असताना अमित शाहांनी एका सेंगोलचा उल्लेख केला.. आता सेंगोल म्हणजे काय? आणि त्याचा उद्घाटन सोहळ्याशी काय संबंध... पाहुयात... एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट