Special Report : गांधीजींच्या सल्लानेच माफीनामा? राजनाथ सिंह यांच्या एका वक्तव्यामुळे देशात नवा वाद
abp majha web team | 13 Oct 2021 11:49 PM (IST)

अंदमानच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दया याचिका दाखल केली होती. यासंदर्भात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे... महात्मा गांधींनी सांगितलं म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तत्कालीन इंग्रज राजवटीकडे दया याचिका केली, मात्र सावरकरांना नाहक बदनाम केलं जातंय असं राजनाथ सिंह म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फाळणी टाळली असती या विषयावर आधारीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत पार पडला. या कार्यक्रमात राजनाथ सिंह, सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते.