Special Report Political Statement : बेताल नेत्यांना चाप कधी? जात-धर्म आणण्याची खुमखुमी कशासाठी?
Special Report Political Statement : बेताल नेत्यांना चाप कधी? जात-धर्म आणण्याची खुमखुमी कशासाठी?
ऑपरेशन सिंदूर ची माहिती देण्यासाठी
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांची निवड करण्यात आली होती. त्या दोघी भारताच्या प्रगतीचा, निर्धाराचा, दहशतवादा विरोधातील लढ्याचा चेहरा बनल्या होत्या. मात्र आपले काही कर्मदरिद्री बेताल नेते त्यांच्यावर जात आणि धर्म पाहून टीका करत आहेत. भाजपच्या मंत्र्याने सोफिया कुरेशींवर तर समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल सिंग यांनी व्योमिका सिंग यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन लाज आणली आहे. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
हे ही वाचा..
भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सैन्य कारवाई आणि युद्धजन्य परिस्थिती तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी उघडपणे पाकिस्तानचा पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे, भारतीयांनी या दोन देशांबद्दल आपली कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. भारत सरकारने देखील तुर्की (turkey) देशाला दणका द्यायचं ठरवल्याचं दिसून येत आहे. देशभरात "बॅन टर्की" चळवळ उभी राहत असून पुण्यात व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकून निर्णायक कारवाई केली. स्थानिक आयातीऐवजी इतर व्यापाऱ्यांकडून खरेदी करणे पसंत करून सामान्य नागरिकदेखील या चळवळीत आपलं योगदान दिलं. तर ट्रॅव्हल्स एजन्सींकडूनही तुर्की देशातील पर्यटनासाठी बुकींग न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, व्यापार उद्योगात तुर्की देशाला मोठा फटका बसणार आहे. त्यातच, हैदराबादमधील उर्दू विद्यापीठात (University) शिकवणाऱ्या तुर्कस्थानी प्राध्यापकांची घरवापसी करण्यात येत आहे.