Special Report | साधूंवर विश्वास ठेऊ नका; विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2021 08:58 PM (IST)

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साधू आणि संत यांच्यातील फरक सांगताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. साधू आणि संत वेगळे असतात. साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात, असं वादग्रस्त वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. आपल्या वक्तव्याचा व्हिडीओ वड्डेटीवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विजय वड्डेट्टीवार यांच्यावर भाजप अध्यात्मित आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी टीका केली आहे. साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जाण्याचा इशाराही तुषार भोसले यांनी दिला आहे.