Special Report | 'अर्जुना'चं घर, 'कौरवां'चा डोळा? तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी
राहुल तपासे, एबीपी माझा | 04 Aug 2021 07:58 PM (IST)
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाजी चांगली कामगिरी केलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रविण जाधववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गरीब कुटुंबातून प्रचंड संघर्ष करत प्रवीणनं देशपातळीवर नाव कमावलं मात्र त्याच्या कुटुंबाचीमात्र साताऱ्यातील त्याच्या गावी अवहेलना होतेय. एवढंच नाही तर गावातील काही लोकांनी दिलेल्या त्रासामुळे प्रवीण जाधवचं कुटुंब बारामतीला कायमच स्थायिक होण्याच्या तयारीत आहे.