✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report On Tejaswini Ghosalkar : जय महाराष्ट्र! तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी

abp majha web team  |  13 May 2025 11:56 PM (IST)
ABP News

Special Report On Tejaswini Ghosalkar : जय महाराष्ट्र! तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी


 तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोड चिट्ठी. ठाकरेंच्या जवळच मानल्या जाणाऱ्या घोसाळकर कुटुंबात उभी फूट पडते की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्याला कारण आहे माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा. तेजस्वी घोसाळकरांनी विभागप्रमुखांकडे राजीनामा दिल्याचं समजतय. तेजस्वी घोसाळकर यांच्यावर पक्षान तहिसर विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीची जबाबदारी सोपवली होती. साल 2017 मध्ये तेजस्वी घोसाळकर याच प्रभागातून शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2024 मध्ये पती अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतरही तेजस्वी घोसाळकर डगमगल्या नाहीत. तेजस्वी घोसाळकर राजकारणात सक्रिय असल्याच दिसलं. मात्र आता त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला राजीनामा दिलाय. पण तेजस्वी घोसाळकरांनी हे टोकाच पाऊल का उचलल असावं तर त्याच कारणही पाहूयात. स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल वारंवार नाराजी व्यक्त करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने तेजस्वी घोसाळकरांनी राजीनामा दिलाय अर्थात या चर्चा आहे कारण अद्याप तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया आली नाहीये मात्र त्यांच्या राजीनाम्यातून नाराजीचा दर्शन होत आहे दीड वर्षांपूर्वी तेजस्वी घोसाळकरांचे पती अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली या कठीण काळात संपूर्ण ठाकरे कुटुंब घोसाळकरांसोबत होतं विधानसभेतही घोसाळकर कुटुंबाला संधी देण्यात आली खरं तर त्यावेळी तेजस्वी घोसाळकरांच नाव चर्चेत होतं पण प्रत्यक्षात माजी आमदार विनोद घोसाळकरांच्या हाती आमदारकीच तिकीट पडलं. मात्र भाजपच्या उमेदवारापुढे विनोद घोसाळकरांना पराभव पतकरावा लागला. तेजस्वी घोसाळकरांना विधानसभेचा तिकीट जरी मिळालं नसलं तरी पक्षाने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली होती. पण आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. ठाकरेंची साथ सोडलेल्या तेजस्वी घोसाळकर भविष्यात भाजपच. कमळ हाती घेण्याची शक्यता वर्तवली जाते. तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मातोश्रीवरही बोलावण्यात आले. आता तेजस्वी घोसाळकर मातोश्रीवर जाणार का? उद्धव ठाकरे सासर्यांच्या मदतीने सुनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार का? तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर होणार की मग दुरावा कायम राहणार हे पाहणं महत्त्वाच असेल.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report On Tejaswini Ghosalkar : जय महाराष्ट्र! तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.