राज्यसभेतील गदारोळानंतर आरोप - प्रत्यारोपाचं राजकारण! संसदेच्या गोंधळाला नक्की जबाबदार कोण? ABPMajha
प्रशांत कदम, एबीपी माझा | 12 Aug 2021 11:05 PM (IST)
राज्यसभेत काल जो अभूतपूर्व गोंधळ झाला त्यानंतर सभागृह आहे की कुस्तीचा आखाडा असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. सभागृहात खासदारांऐवजी मार्शल्सची संख्या जास्त दिसत होती. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या गोंधळावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही काल 127 व्या घटनादुरुस्तीवर चर्चा झाली आणि विधेयक देखील मंजूर झालं. चार आठवड्यांमध्ये हे एकमेव विधेयक होतं, ज्यासाठी विरोधक सहकार्य करायला तयार झाले होते. काल संध्याकाळी सहापर्यंत त्यामुळे सभागृह ठीक चाललं होतं.पण हे विधेयक संपल्यानंतर सरकारनं विमा संशोधन विधेयकही मांडायला घेतलं आणि गदारोळ सुरु झाला.