✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Antilia Explosives Scare | स्फोटकं प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? | Special Report

एबीपी माझा वेब टीम  |  01 Mar 2021 09:36 PM (IST)
ABP News

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान असलेल्या अँटिलियापासून हाकेच्या अंतरावर चार दिवसांपूर्वी स्फोटक असलेली गाडी ठेवण्यात आली होती. मात्र यामागे कोण आहे? याचा पत्ता अद्याप लागू शकला नाही. 700 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. 10 पोलीस पथकं तयार करण्यात आली. राज्य आणि केंद्रीय तपास यंत्रणा सज्ज झाल्या तरी अजून या मागचा मास्टर माईंड कोण आहे? हे मात्र कळू शकलं नाही.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर रस्त्यावर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पहिला पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता, तो म्हणजे स्कॉर्पिओ पार्क करतानाचं सीसीटीव्ही फुटेज. ज्या व्यक्तीने कार पार्क केली होती, तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला होता. त्याने मास्क घातला होता, तर डोके हुडीने झाकलेले होते. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नव्हती. मात्र हाच प्रश्न आज 4 दिवसानंतर सुद्धा कायम आहे. केंद्रीय तपास यंत्रणा NIA सुद्धा या प्रकरणी चौकशी करत आहे. मात्र त्यांच्या हाती सुद्धा अद्याप काही लागलं नाही. काल 'जैश उल हिंद' या संघटनेच्या माध्यमाने टेलिग्रामवर एक पोस्ट करून या प्रकरणाची जबाबदारी घेण्यात आली. मात्र संध्याकाळ पर्यंत 'जैश उल हिंद'ने हे कृत्य केलं नसून आमच्या नावाचा वापर केल्याची एक पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


काल जैश उल हिंद या संघटनेनं त्यांच्याकडून अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यासंदर्भात जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे मग या संघटनेचं नाव घेऊन पोलिसांना चकवा देण्याचं तर काम नाही ना असाही सवाल उपस्थित होतोय.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Antilia Explosives Scare | स्फोटकं प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? | Special Report

TRENDING VIDEOS

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल4 Hour ago

Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला4 Hour ago

तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?5 Hour ago

भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती6 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.