Special Report : निसर्गरम्य Mahabaleshwar आणि बहरलेलं 'कास'; 'Kaas Plateau'पाहण्यासाठी आता खास सफारी
राहुल तपासे, एबीपी माझा Updated at: 26 Aug 2021 03:08 PM (IST)
सह्याद्रीचा कुशीतील कास पठार आणि मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर ही दोन्ही ठिकाणं सध्या पर्यटकांना खुणावतायत. लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातल्या पर्यटनस्थळांवरचे निर्बंध वाढवण्यात आले होते. पण आता याच निर्बंधात शिथिलता आल्यानं पर्यटकांची पावलं पुन्हा या पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत. जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेलं कास पठार आणि महाबळेश्वरमध्ये सध्या निसर्गाचं रुप कसं खुललंय याचाच आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी राहुल तपासेंचा हा रिपोर्ट