Maharashtra Bandh : तीन पक्ष...एकच लक्ष्य... महाराष्ट्र बंद...Special Report
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2021 10:10 PM (IST)
लखीमपूर हिंसाचाराचा महानिषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतले तिन्ही पक्षांनी आज महाराष्ट्र बंद पुकारला.... तिन्ही पक्षच नाही तर इतर पक्षांनीही या बंदत सहभाग घेतला... शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनं यांनी एकत्र येत त्यांच्या आपल्या स्टाईलनं या बंदमध्ये सहभाग घेतला... सध्या सरकारमध्ये एकत्र नांदणाऱ्या या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.... प्रत्येकनं एक-एक बाजू संभाळत आजचा बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला... यूपीत घडलेल्या हिंसाचारासाठी महाराष्ट्र बंद ठेवण्यावरुन काही ठिकाणी विरोध ही झाला... पण प्रश्न शेतकऱ्यांचा होता... एकूणच कशाप्रकारे आजचा महाराष्ट्र बंद होता... या तिन्ही पक्षांची भूमिका काय होती... कुणाकडे कोणती जबाबदारी होती पाहुयात या रिपोर्टमधून