Special Report | केदारनाथ प्रलयाचा साक्षीदार; उस्मानाबादच्या गहिनीनाथ लोखंडे यांची कहाणी
एबीपी माझा वेब टीम | 09 Feb 2021 11:03 PM (IST)

सात वर्षांपूर्वी आज जसा उत्तराखंड मध्ये प्रकोप झालाय..तशीच घटना घडली होती. त्यात महाराष्ट्राकडून सुध्दा कांही कुटुंब वाहून गेली. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील नळीवडगावचे गहिनीनाथ लोखंडे हे केदारनाथ ,बद्रीनाथ यात्रेत गेले असता मोठी ढग फुटी झाली पण सुदैवाने महाराज बचावले. त्यांनी आपल्या मनाशी खुणगाठ बांधली. आपलं राहिलेले जीवन हे वृद्ध लोकांसाठी अर्पण करायचं. लोखंडे महाराज भिक्षा मागून ३२ निराधार वयोवृध्दांचा सांभाळ करत आहेत..