Special Report : एक देश, बाबा अनेक, दावे कित्येक; भूतकाळातल्या बाबांच्या कारनाम्यांचा पाढा
abp majha web team | 22 Jan 2023 11:47 PM (IST)

बातमी बागेश्वर महाराजांसंदर्भातील.. या महाराजांच्या चमत्काराची सध्या सर्वत्र चर्चा आहे..आणि म्हणूनच या महाराजांना अंनिसने एक आव्हान दिलं. जे या महाराजांनी स्विकारलंही. पण एखादा आध्यात्मिक गुरु आणि त्याच्याभोवती निर्माण झालेलं वादाचं वलय.. हे पहिल्यांदा घडलेलं नाही... यापुर्वीही अशा आध्यात्मिक गुरुंवरुन अनेकदा वाद निर्माण झालाय. यानिमित्ताने काही जुन्या वादांवरही नजर टाकूया.