special Report on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी, ओबीसींचं बळ वाढणार
special Report on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी, ओबीसींचं बळ वाढणार
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर छगन भुजबळांनी वर्णी लागली. त्यानंतर आता धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (20 मे) रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले. त्यामुळे धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि इतरांवर आरोप झाले. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने मुंडे यांच्यावरही आरोप झाले. त्या प्रकरणी दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
दुसरीकडे, मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले छगन भुजबळ सुरुवातीपासूनच नाराज होते. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा व्यक्त करत अजित पवारांवरही टीका केली होती. समता परिषदेच्या जागोजागी सभा, मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती. भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. मात्र अजित पवारांची साथ सोडली नव्हती.