Mumbai Corona | लग्न समारंभ,हॉटेल्सवर धाडी पडणार; मुंबईकरांवर मेगा प्लॅनची वेळ का आली?Special Report
मनश्री पाठक, एबीपी माझा | 18 Feb 2021 10:30 PM (IST)
मुंबई : मुंबईत कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मेगाप्लॅन आखला आहे. मुंबईत आता कोरोनाबाधित, होम क्वॉरन्टीन व्यक्ती फिरताना आढळल्यास थेट एफआयआर दाखल होणार आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्लाब सिंह चहल यांची सर्व वॉर्ड ऑफिसर, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभागासोबतची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हे आदेश दिले आहेत.