Aurangabad Corona | कोरोना गाव-खोड्यात पसरला; औरंगाबादमधून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा | 25 Mar 2021 08:12 PM (IST)
कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग वाढला. रुग्ण वेगाने वाढू लागलेत. एका व्यक्तीपासून पाच जणाला नव्हे तर दहा पेक्षा अधिक जणांना कोरणाची बाधा होवू लागली आहे. एबीपी माझाने एक मोठे शहर आणि ग्रामीण भागाचा आकडेवारीसह पडताळणी केली. तेव्हा लक्षात हे आलं की कोरोना तळागाळात पसरला आहे.
औरंगाबाद शहरात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पहिल्या दिवशी हर्सुल टी पॉइंटवर 55 जणांची अॅन्टीजेन चाचणी झाली. 55 पैकी तब्बल 23 जण कोरोनाबाधित आढळून आलेत. म्हणजे टेस्ट केलेल्यापैकी 45 टक्के बाधीत आढळले.