Special Report: पालघरच्या वाडा - भिवंडी महामार्गावरील रस्त्याची अक्षरशः चाळण, मात्र सरकारचं दुर्लक्ष
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 11 Aug 2021 11:35 PM (IST)
वाडा भिवंडी या 41 किलोमीटरच्या महामार्गाची सध्या अतिशय दुरवस्था झाली असून या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळते. या रस्त्यावर दिवसा गणिक चार ते पाच अपघात सुरूच असून या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण अपंगत्वाची लढाई लढत आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाकडे लक्ष द्यायला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सरकारकडे ही वेळ नाही. त्यामुळे येथील जनता आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.