Pune : बांग्लादेशचं मंडोल दाम्पत्य पुण्यात अडकलं, परतीसाठी दूतावासाच्या परवानगीची प्रतीक्षा
मिकी घई, एबीपी माझा | 10 Aug 2021 10:26 PM (IST)
मायदेशी परत जाण्याची ओढ लागलेल बांगलादेशमधील मोहंमंद आणि मजीदा मंडोल हे दाम्पत्य गेल्या 2 महिन्या पासून पुण्यातील फरसखाना पोलिस ठाण्यामध्ये आपल्या कायदेशीर प्रत्यर्पणाची प्रतीक्षा करत आहेत. न्यायालयाने मायदेशी परत जाई पर्यंत पोलिस निगराणी मध्ये राहण्याच्या आदेश दिल्याने मंडोल दाम्पत्य गेल्या दीड महिन्या पासून पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यामध्येच मुक्काम करून आहेत. बांगलादेशात त्यांचे तीन लहान मुलं असून त्यांच्या आठवणीने या दोघांनाही अश्रू अनावर होत आहेत