Special Report Nafed Onion :कांदा खरेदीचे आकडे, सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाकडे : ABP Majha
abp majha web team | 01 Mar 2023 11:21 PM (IST)

बातमी नाफेड कांदा खरेदीची. नाफेडमध्ये कांदा खरेदी सुरु झाल्याचं कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी नाफेडने २.३८ लाख टन कांदा खरेदी केल्याचा दावाही केला. पण प्रत्यक्षात नाफेडने गेल्या तीन दिवसांत फक्त ६३७.३८ टन लाल कांदा खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिल्याची चर्चा सुरु झालीये. आणि यावरुनच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार केलाय. पाहूया कांद्यांवरुन कसं पेटलंय राजकारण...