Special Report : काय करावं सुचेना... नेटकरी सैराट; नेटकऱ्यांची क्रिएटिव्हिटी, मिम्मचा पाऊस
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2021 12:00 AM (IST)

फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्रामचे (Instagram) जगभरातील सर्व्हर तब्बल सहा तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका या तीनही सोशल मीडिया कंपन्यांना चांगलाच बसलाय. फेसबुकचा विचार केला तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हर स्लोडाऊन होता. 2019 सालीही फेसबुकला अशा स्थितीचा सामना करावा लागला होता. कालच्या या घटनेनंतर फेसबुकचं मोठं नुकसान झालं असून त्याचे शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले आहेत.