Special Report Maharashtra Karnataka Crisis : राज्यपालांच्या वादामुळेचं बोम्मईंकडून सीमावाद?
abp majha web team | 25 Nov 2022 10:30 PM (IST)

आता बातमी राज्यात सुरु असलेल्या एक वादाची... गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावादाची ठिणगी पडलीय. कारण, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांवर दावा सांगितला.. त्यानंतर महाराष्ट्रातून विरोध सुरु झाला. आता बोम्मई यांनी त्यापुढे जात थेट सोलापूरवरच दावा केला. त्यानंतर महाराष्ट्रात आणखी आक्रमक आंदोलनं सुरु झाली. त्यानंतर शिवसेनेनं एक दावा केला. आणि बोम्मई यांच्या वक्तव्यानंतरच्या वादाला एक वेगळीच दिशा मिळाली. कोणतं आहे ते वक्तव्य... आणि त्यानंतर कोणता वाद सुरु झालाय पाहुयात ...