Special Report : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचं घोगंडं भिजत, सीमावादावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर
abp majha web team | 14 Apr 2023 12:00 AM (IST)
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद खटल्याच्या सुनावणीतून सुप्रीम कोर्टाच्या आणखी एका न्यायमूर्तींनी अंग काढून घेतलंय. न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी यातून माघार घेतलीये. त्यामुळे हे प्रकरण आता सूचीबद्ध करण्यासाठी पुन्हा सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात आलंय. आत्तापर्यंत ४ न्यायमूर्तींनी या केसमधून अंग काढून घेतलंय. दोन दशकांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण अजूनही या प्रकरणाच्या सुनावणीला मुहुर्त मात्र मिळत नाहीये. त्यामुळे सीमावादाचं भीजत घोंगडं आणखी किती काळ राहणार हा प्रश्न विचारला जातोय.......