Special Report : कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट कमी का होत नाही?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या पहिल्या लाटेत सगळ्यात सुरक्षित जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख होती. मात्र आता कोरोनाच्य दुसऱ्या लाटेत सगळ्यात धोकादायक जिल्हा म्हणून आता समोर येतोय.. राज्यातील इतर जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असताना कोल्हापूरचा आलेख मात्र चढा राहिलाय.
राज्यात दुसरी लाट काहीशी कमी होत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र दररोज शेकडो रुग्ण वाढत आहेत. त्याला काय व्हुतय म्हणत जो तो गर्दी करत सुटतोय. जिल्हा प्रशासनानं नियम तर कडक केलेत पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीत. त्यामुळं हे नियम केवळ कागदावर आहेत का असा प्रश्न पडतो. जी परिस्थिती शहरात आहे त्याच्या पेक्षा जास्त वाईट परिस्थिती ग्रामीण भागाची आहे. कोरोना चाचणी करुन घेण्यास कोण पुढं येत नाही आणि रुग्ण गंभीर झाला की सगळ्यांची धावाधाव होतेय. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त त्याठिकाणी लसीचं प्रमाण जास्त ठेवण अपेक्षित आहे. पण कोल्हापुरात तसं होताना दिसत नाही.