Special Report : जंतरमंतरवरच्या आदोलनाचं पुढे काय? शाहांसोबतच्या बैठकीनं आंदोलन शमणार? : ABP Majha
abp majha web team | 05 Jun 2023 10:40 PM (IST)
स्पेशल रिपोर्टमध्ये स्वागत आणि बुलेटीनची सुरुवात करुया पैलवानांच्या आंदोलनाच्या बातमीने...कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत त्यांना अटक करा या मागणीसाठी गेल्या ४३ दिवसांपासून पैलवानांचं आंदोलन सुरु आहे.. पण या आंदोलनाची दिशा आता बदलली...जंतरमंतरवर बसून आंदोलन न करता... कामावर रुजू होवून आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय पैलवानांनी घेतला. अमित शाहांच्या भेटीनंतर आंदोलनाचं वादळ शांत झालं. तर दुसरीकडे बृजभूषण सिंहांवरचे आरोप एका महिला खेळाडूने मागे घेतल्याची चर्चा आहे... काय आहे नेमकं हे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून...