Special Report : Jammu मध्ये बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी : ABP Majha

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना झालीय. पूंछ जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झालेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. ही बस सौजियान येथून मंडी येथे चालली असताना ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक, पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं. जखमींना एअरलिफ्ट करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करीत मृतांच्या परिवाराला २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केलीय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांनीही शोक व्यक्त केलाय. जम्मू काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शोक व्यक्त करीत मृताच्या परिवाराला पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केलीय.