Special Report : Jalgaon Honour killing : बाप झाला वैरी! जळगावच्या चोपड्यात 'सैराट'! 27 April 2025

Special Report : Jalgaon Honour killing : बाप झाला वैरी! जळगावच्या चोपड्यात 'सैराट'! 27 April 2025
जळगावातल्या चोपडा शहराच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती घडलीय...
हळदीच्या कार्यक्रमातच एका बापानं आपल्या मुलीवर गोळ्या झाडल्यात...
ज्यात मुलीचा मृत्यू झालाय. तर जावई अविनाश यांच्या पाठीवर आणि हातात गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी झालेत.
धक्कादायक म्हणजे हे कृत्य करणारा आरोपी बाप हा सेवा निवृत्त सीआरपीएफचा जवान आहे... प्रेमविवाह केल्याच्या रागातून या बापानं या आपली मुलगी तृप्ती वाघ आणि जावई अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला...
साधारण वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता.
विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं.
चोपडा इथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते दोघे आले होते.
तृप्ती आणि अविनाश येणार याची माहिती मिळताच तृप्तीचे वडील तिथे पोहोचले आणि या लग्न मांडवातच रक्ताचा सडा सांडला.