Special Report : भाजपमध्ये मी मस्त, निवांत,चौकशीची चिंता नाही; हर्षवर्धन पाटील यांचं सूचक वक्तव्य
abp majha web team | 13 Oct 2021 11:58 PM (IST)

राज्यात ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याकडून वेगवेगळ्या नेत्यांची चौकशी सुरू असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलेलं सूचक वक्तव्य चर्चेचा विषय ठरलंय. भाजपमध्ये मस्त आणि निवांत आहे, शांत झोप लागते, कारण सध्या आपली चौकशी वगैरे काही सुरू नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलंय..
एकीकडे केंद्रातले सत्ताधारी राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना विनाकारण त्रास देतात असा आरोप केला जातो..या आरोपांना हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यामुळं बळ मिळालंय.