Special Report : Foxconn प्रकल्प कुणामुळे निसटला? कुठे शिंकली माशी? होणार चौकशी? : ABP Majha
abp majha web team | 15 Sep 2022 10:57 PM (IST)

फॉक्सकॉनवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर आशिष शेलारांनी पलटवार केलाय. कट कमिशन, वाटाघाटी आणि दबावतंत्राचा संशय उपस्थित करत मविआच्या भूमिकेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायामूर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणी शेलारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.. तसंच याकूब कबर प्रकरणामुळे नाचक्की झाल्याने फॉक्सकॉन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला जातोय अशा शब्दात शेलारांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय..