माजी सीईओ Chitra Ramakrishna हिमालयातील योगीच्या इशाऱ्यावर काम करायच्या त्याचा शोध लागलाय
abp majha web team
Updated at:
12 Mar 2022 10:50 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण ज्या हिमालयातील योगीच्या इशाऱ्यावर काम करायच्या त्याचा शोध लागलाय. हा योगी दुसरा तिसरा कोणी नसून एनएसईचा माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यमच आहे. सीबीआयने तपास करून न्यायालयाला या ‘रहस्यमयी योगी’चं नाव सांगितलंय. चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयातील योगीच्या सांगण्यावरून काम करीत असल्याचं चौकशीत सांगितलं होतं. पण तो योगी कोण हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. या आनंद सुब्रमण्यम यांना तथाकथित योगींच्या सांगण्यावरूनच चित्रा रामकृष्ण यांनी एनएसईत उच्च पदावर बसवलं होतं