Special Report : जिथे जिथे शिंदे,कुठे आहेत ठाकरे महाराष्ट्राचा सण, निवडणुकीचं रण : ABP Majha
abp majha web team | 02 Sep 2022 11:23 PM (IST)

दुसरीकडे, सत्ता गेल्यानंतर, जी जनसंपर्काची घाई शिवसेनेने करण्याची गरज होती... ती घाई कुठेच दिसत नाही... उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या तीन मोठ्या गणपतींचं दर्शन सोडलं... तर कुठेच दर्शनासाठी हजेरी लावली नाही... खरं तर ठाकरेंवर निष्ठा दाखवलेल्या आमदार आणि खासदारांच्या घरी तरी ठाकरे जातील असं वाटलं होतं... पण अजून तरी उद्धव ठाकरे बाहेर पडलेले नाहीत