Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
सर्जनशील आणि संवेदनशील दिग्दर्शिका...समाजमन रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या सुमित्रा भावे यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Apr 2021 10:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे : अस्तु, दहावी फ, नितळ, संहिता, दोघी, वेलकम होम, एक कप च्या असे अत्यंत तरल आणि पठडीबाहेरचे विषय अत्यंत सोप्या, सहज पद्धतीने चित्रपटात मांडणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात त्यांनी सोमवारी (19 एप्रिल) सकाळी सव्वासात वाजता अखेरचा श्वास घेतला.